लांजा बसस्थानकातील प्रकार, पालू येथील ३९ वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी): किरकोळ कारणावरून एसटी बस वाहकाचे अंगावर धावून जात, अश्लील शिवीगाळ, तसेच शर्टाची कॉलर पकडून चिरून टाकेन अशी धमकी दिल्याची घटना लांजा बस स्थानकात घडली असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात पालू येथील ३० वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद राहुल लक्ष्मण खानविलकर (वय ३९, राहणार दत्तनगर देवरुख) हे राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगारात वाहक म्हणून काम करतात. मंगळवार दिनांक २ जून रोजी ते देवरुख लांजा ही एसटी बस (क्रमांक एम एच १४- बीटी २३१६) घेऊन लांजा येथे आले होते. दुपारी २.३० च्या सुमारास ते आपल्या बस मध्ये बसले होते. यावेळी बस मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यानंतर प्रवाशांना घेऊन सदर एसटी बस लांजा एसटी स्टँड मधून सुटली. यावेळी बस मध्ये असलेल्या अक्षय तुकाराम खाके (वय ३०, राहणार पालू खाकेवाडी) त्याने मोठ्याने ओरडून बस थांबवा, माझी आई खाली आहे असे सांगितल्यानंतर चालक जितेंद्र माईन यांना बस थांबवण्यात सांगितले. त्यामुळे ही बस थोड्या अंतरावर जाऊन थांबली. यावेळी अक्षय खाके याने वाहक राहुल खानविलकर यांना अश्लील शिवीगाळ केली. बस मधून खाली उतरून तो पुन्हा शिवीगाळ करू लागला. यावेळी वाहक खानविलकर यांनी तुम्हाला तुमचा काय जो प्रॉब्लेम असेल तो कंट्रोल मध्ये जाऊन बोला असे सांगितले.
याचा राग येऊन अक्षय खाके हा वाहक खानविलकर यांच्या अंगावर धावून गेला. तसेच त्यांचा खिसा फाडून शर्टाची कॉलर पकडून शिवीगाळ केली तसेच चालक जितेंद्र माईन यांच्याकडे पाहून चिरून टाकी अशी धमकी दिली. अशाप्रकारे एसटी चालक आणि वाहक यांना शासकीय कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत् केले या प्रकरणी वाहक राहुल खालविलकर यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी अक्षय खाके याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, ११५(२), १३१, ३५२,३५१(२) ३२४(२), प्रमाणे तसेच भादवि कलम ३५३,३२३,३५२,५०४,५०६,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकन्या मैदाड क्या करत आहेत













