दापोली जालगाव ब्राह्मणवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या सौ.मयुरी मंदार जोशी यांना वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन नाशिक येथे ज्योतिष भूषण पदवी प्रदान करुन गौरवण्यात आले व कृष्णमूर्ती विशारद पदवीदान देण्यात आले
दापोली:
वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानतर्फे आयोजित राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन, भूषणम् पुरस्कार सोहळा आणि पदवीदान समारंभ ३१ मे २०२६ रोजी गंगापूर रोड येथील शंकराचार्य संकुलात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांना ‘वास्तुभूषण’ तर श्री. दीपक वाघ यांना ‘ज्योतिष भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अधिवेशनाचे उद्घाटन ज्योतिषाचार्य लक्ष्मीकांत जोशी यांच्या हस्ते झाले.डॉ. कुलभूषण मंगळे यांनी डॉ. नरेंद्र सहस्त्रबुद्धे यांनी वास्तुशास्त्र, ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन वेदभूषण ज्योतिष प्रतिष्ठानचा उच्चस्तरीय ‘ज्योतिष भूषण’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांना ‘ज्योतिष भूषण’ पदवी प्रदान करण्यात आली. तसेच अभ्यासक्रम पूर्ण कृष्णमूर्ती विशारद प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याच अधिवेशनात मयुरी जोशी यांना ज्योतिष भूषण पदवी प्रदान करुन गौरवण्यात आले व कृष्णमूर्ती विशारद पदवीदान देण्यात आले*.
या उत्तुंग यशाबद्दल मयुरी जोशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.













