लांजा (प्रतिनिधी) विश्वहिंदु परिषद आणि बजरंग दल लांजाच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट रोजी
अखंड भारत दिन मशाल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड भारत या संकल्पनेत, सद्य भारत तसेच पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, ब्रम्हदेश, अफगाणिस्तान, भूतान, तिबेट, श्रीलंका आहे,अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. १४ ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने विश्वहिंदु परिषद, बजरंग दल लांजाच्या वतीने १४ ऑगस्ट २०२३ रोजी अखंड भारत दिवस साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने अखंड भारत दिन मशाल फेरी निघणार
सोमवार १४ ऑगस्टरोजी संध्याकाळी ५:३०वाजता
श्रीराम मंदिर लांजा येथून या मशाल फेरीला सुरुवात होणार असून लांजाचे जागृत ग्रामदैवत श्री केदारलिंग मंदिर येथे कार्यक्रमाची सांगता होणार आहे.











