रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहर परिसरात गस्त घालत असताना साळवीस्टॉप येथील भंगार दुकानात चोरीची दुचाकी आढळून आल्या प्रकरणी दुकान मालकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 4.45 वा.सुमारास करण्यात आली.
रियाज फारुख अफराज (21,रा.स्टेट बँक कॉलनी चर्मालय,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यास विरोधात पोलिस काँस्टेबल निलेश शिंगवे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी ते शहर परिसरात गस्त घालत असताना त्यांना साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राउंडच्या बाजुला एका भंगार विक्रेत्याकडे एक नंबर प्लेट नसलेली ॲक्सेस दुचाकी दिसून आली. पोलिसांनी दुकान मालक रियाजकडे याबाबत चौकशी केली असता त्याच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे मिळून आली नाहीत. तसेच तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली.












