मालवण भाजपच्या वतीने किल्ले सिद्धगड येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा 

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती  

मालवण | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील ओवळीये येथील किल्ले सिद्धगड येथे शिवराज्याभिषेक दिन शनिवारी उत्साहात संपन्न झाला. यावेळी किल्ल्यावर छत्रपतींचा भगवा ध्वज फडकवत महाराजांच्या जयघोषाने सिद्धगड परिसर दुमदुमुन गेला.

 

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी छत्रपतींच्या दुर्गम, दुर्लक्षित गडकिल्ल्यांचे महत्व आणि त्याचे संवर्धन यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. याठिकाणी परिसराचा विकास याकडे ही लक्ष दिले जाणार आहे. किल्ल्याची सुरक्षा तथा संवर्धन याबाबत विशेष लक्ष आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, मंत्री आशिष शेलार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना याबाबत माहिती दिली जाईल व या किल्ल्यासाठी विकासाची दिशा निश्चित केली जाईल असे चिंदरकर यांनी स्पष्ट केले. ओवळीये सरपंच रंजना पडवळ यांनीही विचार मांडले.

 

यावेळी भाजप तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर,

माजी उपसभापती राजू परुळेकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेंद्र चव्हाण, किर्लोस सरपंच साक्षी चव्हाण, हिवाळे सरपंच रघुनाथ धुरी, रामगड सरपंच शुभम मठकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रवीण घाडीगावकर, अरुण मेस्त्री, उद्योजक बाबा आंगणे, अभय प्रभूदेसाई, बंडू गावडे, विरेश पवार तसेच किल्ले सिद्धगड सरदार वंशज बाळा सावंत, विविध शिवप्रेमी, बाल शिवाजीची वेषभूषा केलेले बालक आणि ओवळीये व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.