जागतिक पर्यावरण दिननित्ताने मालवण पंचायत समिती येथे वृक्षारोपण

सभापती प्रज्ञा चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्या हस्ते नारळ वृक्षाचे रोपण

मालवण | प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मालवण पंचायत समितीच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या निमित्ताने पंचायत समितीच्या आवारात सभापती प्रज्ञा चव्हाण, प्रभारी गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत यांच्या हस्ते नारळ वृक्षाचे रोपण करण्यात आले.

“केवळ वृक्षलागवड नव्हे तर वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोकणची ओळख असलेल्या नारळाच्या रोपाची लागवड करून पंचायत समितीने पर्यावरण दिनाचा संदेश दिला आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या वेळी पंचायत समितीचे सर्व विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित सर्वांनीच पर्यावरण रक्षणाची आणि वृक्ष जोपासण्याची शपथ घेतली.