वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील कुशेवाडा गावातील शेतकऱ्यांना कुशेवाडा ग्रामपंचायत मार्फत अलनिनो चा प्रादुर्भाव लक्षात घेता आज सोमवार ८ जून रोजी कमी कालावधी च्या भाताचे सुधारित बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले.
कुशेवाडा ग्रामपंचायत मध्ये झालेल्या या कार्यक्रमात सरपंच श्री निलेश सामंत, उपसरपंच महादेव सापळे, ग्रामपंचायत सदस्य गणपत माधव, विठोबा राणे, सिद्धेश मांडये, ग्रामसेवक आनंद परुळेकर व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.
दरवर्षी ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे शेतकऱ्यांना वाटप केले जाते. यावर्षी अलनींनो मुळे होणारा कमी पाऊस त्यासाठी काय काळजी घ्यावी या बद्दल शेतकरी यांना माहिती देण्यात आली आणि मोफत भात बियाण्याचे वाटप करण्यात आले.













