
बांदा : प्रतिनिधी
जुन्या मुंबई – गोवा महामार्गांवर इन्सुली कोंडवाडा येथे कदंबा व कार यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पणजी – बेळगाव कदंबा इन्सुली कोंडवाडा येथील वळणावर आली असता समोरून येणाऱ्या बेळगाव येथील कारने कदंबा ला समोरून धडक दिली. सुदैवाने कार मधील प्रवाशांना दुखापत झालेली नाही. अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.













