गुहागर – विजापूर महामार्गावर देवघर येथे मृतावस्थेत सापडला बिबट्या

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर – विजापूर महामार्गावर मौ.देवघर बस स्टॉप जवळ बिबट्या मृत झाल्याचे समजले वरून घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर बिबटया हा अज्ञात वाहनाच्या धडकेत पहाटे सुमारे ०४:०० ते ०५:०० वाजण्याच्या सुमारास मृत झाला असावा असा अंदाज आहे.सदर बिबटया हा नर जातीचा असून तो अंदाजे तीन वर्ष वयाचा आहे.सदर बिबट्यास मा.विभागीय वन अधिकारी रत्नागिरी मा.सहाय्यक वन संरक्षक रत्नागिरी यांचे मार्ग मार्गदर्शनाखाली मृत बिबटया ताब्यात घेऊन पशुधन विकास अधिकारी,गुहागर यांचे कडून शव विच्छेदन करून त्यास अग्नी देऊन शरीर नष्ट केले. सदर ठिकाणी मा. परिक्षेत्र वन अधिकारी चिपळूण, वनपाल गुहागर, वनरक्षक रानवी, वनरक्षक अडुर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील तपास मा. परिक्षेत्र वन अधिकारी, चिपळूण करत आहेत.