युवा पिढीसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आदिल सरगुरोह यांना एकनाथ शेलार यांनी दिल्या शुभेच्छा

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते, तरुण उद्योजक आणि शिवसेनेचे सक्रिय शिवसैनिक आदिल सरगुरोह यांचा वाढदिवस मुंबईतील बाळासाहेब भवन (मंत्रालयाजवळ) येथे काल उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना सचिव एकनाथ शेलार यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, व्यावसायिक आणि पक्षीय कार्याचे विशेष कौतुक केले.
एकनाथ शेलार म्हणाले की, आदिल सरगुरोह हे तरुण वयात समाजकारण, उद्योजकता आणि शिवसेनेचे संघटनात्मक कार्य यांचा उत्तम समन्वय साधत आहेत. पक्षाच्या विचारधारेप्रती त्यांची निष्ठा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता ही निश्चितच कौतुकास्पद आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिल सरगुरोह यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देताना सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात अधिक यश संपादन करण्याचा विश्वास व्य्त केला.
कार्यक्रमादरम्यान शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच युवकांनी समाजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. याप्रसंगी आमिर सरगुरोह, विनोद जाधव, सुशांत पवार, अनिकेत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. उपस्थितांनी आदिल सरगुरोह यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्य्त केल्या. कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आदिल सरगुरोह यांच्या कार्याचा गौरव करत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.