अलोरे येथे जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत राहुल भस्मे विजेता

चिपळूण (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने कॅरम क्लब अलोरे यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कॅरम एकेरी स्पर्धेत राहुल भस्मे यांनी अभिजित खेडेकर यांना पराभूत करत अंतिम विजेते पद पटकावले. कॅरम राज्य कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद कानिटकर यांनी प्रमुख पंच या भूमिकेतून दोन दिवस स्पर्धा संयोजन केले.
यामध्ये कुमार गट ओम पारकर विजेता, द्रोण हजारे उपविजेता ठरला. दुहेरी स्पर्धेत संतोष जोगळेकर, कपिल अभ्यंकर यांनी विजेतेपद तर दिनेश पारकर, ओम पारकर उपविजेते ठरले. १०६ स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विनोद झगडे मित्र मंडळ विशाल ओसवाल, निलेश चावरे यांच्यासहित आदित्य कोलगे, दीपक वाटेकर, हेमंत चाळके, संजय चौधरी, बापू बंगाल, सुहास शिंदे, सुशांत साळवी यांनी सहकार्य केले.