भाजपचे नेते व देवरूखचे माजी उपनराध्यक्ष अभिजीत शेट्ये यांच्या दोन वर्षांच्या प्रयत्नांना अखेर यश
देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख जवळच्या मोगरवणे गावातील दोन कुटुंबाच्या घरात गेली अनेक वर्ष अंधाराच होता. देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्ष होऊन गेली. देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली. परंतु देवरुख शहरापासून केवळ ८ ते ९ किमी अंतरावर असणाऱ्या या गावात चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरापर्यंत वीज पोचली नव्हती. अखेर देवरूखचे माजी उपनगराध्यक्ष श्री अभिजित शेट्ये यांच्या प्रयत्नांना यश आले असून चव्हाण व आयरे कुटुंबाच्या घरात वीज पोचली आहे.
जनसामान्यांचे कोणतेही काम करायचे असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती लागते. देवरूखचे माजी उपनगराध्यक्ष श्री अभिजित शेट्ये यांनी चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरात वीज पोचवण्याचा संकल्प केला. दोन वर्षाच्या अथक पाठपुराव्यानंतर त्यांना अखेर मंगळवारी या कामात यश आले. कालच्या दिवशी गावातील चव्हाण आणि आयरे कुटुंबाच्या घरात वीज पोचली. याबद्दल श्री अभिजीत शेट्ये यांनी बोलताना म्हटले कि, भारतीय जनता पार्टी ज्या ध्येयधोरणावर चालते त्यातील एक महत्वाचे अंत्योदय विकास! समाजातील अंतिम अर्थात समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करणे हे भारतीय जनता पार्टी चे उद्दिष्ट आहे. मला आनंद आहे पार्टीच्या या शिकवणुकी नुसार मी कार्य करत आहे.
देवरूख सारख्या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरात देखील असे एखादे घर असेल जे २५ वर्षा पासून लाईट पासून वंचित आहे. हे कुणाला खरे वाटणार नाही परंतु देवरुख बाजारपेठ पासून सुमारे ८ ते १० किमी दूर असलेल्या मोगरवणे वाडीत राहणारे श्री महेश चव्हाण आणि श्री महेश आयरे यांचे घर बांधून २५ वर्षे झाली तरी लाईट नव्हती. वाडीपासून दूर असलेल्या त्याच्या घरापर्यंत लाइट पोहचवणे खुपच खर्चिक असल्याने महावितरण विभागाला देखील शक्य होत नव्हते. गेली अनेक वर्ष चव्हाण आणि आयरे कुटुंबीय त्यासाठी प्रयत्न करत होते. दोन वर्षा पूर्वी ही बाब माझ्या निदर्शनास आली आणि मी चव्हाण आणि आयरे यांच्या घरी लाईट पोहचवण्याचा निश्चय केला. दोन वर्षाच्या सातत्य पूर्ण प्रयत्नांना अखेर आज यश आले आणि देवरुख मोगरवणे वाडीतील आयरे आणि चव्हाण यांच्या घरी आज लाईट पोहचली. आयरे आणि चव्हाण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान मिळाले. राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन सध्या बदलत चालला आहे. अशा या परिस्थितीत तळागाळातील माणसापर्यंत विकास पोचवण्याचा ध्यास घेतलेली अभी शेट्ये यांच्या सारख्या कार्यकर्त्यांमुळे देवरुखचे भविष्य उज्वल आहे याची खात्री वाटते.













