वैभववाडी, : कोकण रेल्वेच्या वैभववाडी रोड – आचिर्णे विभागात विविध तांत्रिक कामांसाठी १८ जून व २५ जून २०२६ रोजी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
ब्लॉकमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :
१८ जून २०२६ रोजी सुटणारी १२१३४ मंगळुरू – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस करमळी – कणकवली विभागात ११० मिनिटे नियंत्रित (उशिराने) चालविण्यात येईल.
२५ जून २०२६ रोजी सुटणारी हीच गाडी करमळी – कणकवली विभागात १४० मिनिटे नियंत्रित (उशिराने) चालविण्यात येईल.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, तसेच होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.












