नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटीबद्ध! : प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे

मसुरे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व’अभियानास प्रतिसाद

मसुरे | झुंजार पेडणेकर

महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश सामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी, दाखल्यांसाठी किंवा त्यांच्या हक्काच्या योजनासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत हा आहे. आपण सर्वांनी या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तुमच्या काही अडीअडचणी असतील, काही तांत्रिक समस्या असतील, तर त्या आमच्या अधिकाऱ्यांसमोर मांडायला अजिबात संकोच करू नका. आम्ही त्या कायदेशीर चौकटीत राहून, सकारात्मकतेने आणि लवकरात लवकर सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे यानी मसूरे येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान मसुरे मंडळ विभागात भरतगड इंग्लिश मिडीयम स्कुल सभागृहात आयोजित करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. येत्या काळात निवडणूक आयोगाचा ‘एसआरआय’ हा उपक्रम चालू होणार आहे या पडताळणीमध्ये मतदारांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा प्रारंभ मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाला. यावेळी व्यासपीठावर जी प सदस्या सौ क्षमा हडकर, त्रिंबक सरपंच किशोर त्रिंबककर, मालोंड सरपंच पुर्वा फणसगावकर, दुय्यम निबंधक प्रवीण हिंदळेकर, भुमी अभिलेख शिरस्तेदार मंगेश पालव, मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण, मसुरे मंडळ अधिकारी डी. व्ही.शिंग्रे, मंडळ अधिकारी अजय परब, शाळा कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, राजन परब, मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, वैधकीय अधिकारी डॉ वीणा मेहेंदळे, ग्रामपंचायत अधिकारी शंकर कोळसुलकर, श्री प्रकाश सुतार, सौ. माधुरी कामतेकर, सौ. रावले, पुरवठा अधिकारी शिला निकम, माजी सरपंच संदीप हडकर, माजी उपसरपंच राजेश गावकर, राघवेंद्र मुळीक, शामा चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रांतधिकारी यांच्या हस्ते विविध योजनेच्या लाभार्थ्यांना दाखले वाटप करण्यात आले. तसेच ग्रामस्थांच्या समस्यांचे निरासन करण्यात आले.

▪️शासकीय योजनांचा लाभ घ्या! तहसीलदार गणेश लव्हे
मालवण तहसीलदार गणेश लव्हे म्हणाले, नागरिकांना कमीत कमी वेळेत शासकीय सेवा देण्याचा नेहमीच आमचा प्रयत्न असतो. या पुढील काळात जनतेची प्रशासना बाबतची मते नक्कीच अधिक चांगली होतील. शालेय विध्यार्थना आवश्यक दाखले आठवड्या भरात देण्यात येत आहेत. फार्मर आयडी ही केंद्र शासनाची योजना आहे. सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढावा. आरोग्य बाबत विविध योजनांसाठी आवश्यक आयुष्यमान कार्ड सर्वांनी काढून घ्यावे. ई पीक पाहणी बाबत शेतकऱ्यांनी जागृत रहावे असे आवाहन केले.

मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यानी महसूल विभागाच्या या चांगल्या उपक्रमा बाबत आभार मानले. जन्म नोंद नसलेल्या लाभार्थीचा जन्म दाखला देताना कमीत कमी कागदपत्रे घ्यावीत असे आवाहन केले. वैधकीय अधिकारी डॉ. वीणा मेहेंदळे, निबंधक प्रवीण हिंदळेकर, भूमि अभिलेखचे शिरस्तेदार मंगेश पालव, मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यानी त्यांच्या विभागा अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. यावेळी ग्राम महसूल अधिकारी दत्तात्रय खुळपे, रविंद्र अहिरे, प्रतिभा अंभुरे, श्री. रेकुळवाळ, महसूल सेवक संतोष चव्हाण, सचिन चव्हाण, वर्षा रामाणे, विकास पोयरेकर, सोनल खरात, सेतू संचालक नवनाथ गोसावी, विलास बागवे, राजेश लब्दे, तसेच पोलीस पाटील, कृषी सेवक, शासकीय योजना लाभार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. जी प सदस्य सौ क्षमा हडकर, राजन परब यांनी शुभेच्छा दिल्या. मसुरे मंडळ अधिकारी डी. व्ही.शिंग्रे आणि कर्मचारी चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख काम करत असल्याबद्दल यावेळी गौरवोदगार काढण्यात आले. प्रास्ताविक संग्राम प्रभूगावकर, सूत्रसंचलन आणि आभार सायली म्हाडगूत यानी मानले.