रत्नागिरी :
पटवर्धन हायस्कूल व नाटेकर कला ,गांधी वाणिज्य व कीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आर.टी.ओ यांच्या संयुक्त विद्यमाने पोक्सो कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा व रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाच्या वेळी जिल्हा न्यायाधीश सन्मा.श्री सुमित विजयकुमार जोशी, मोटर वाहन निरीक्षक श्री. संतोष साळुंखे सर ,श्री प्रवीणकुमार महादेव पाटील सर व ॲडव्होकेट सुप्रिया सावंत मॅडम ,विधी स्वयंसेवक साक्षी गावडे मॅडम उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर मॅडम व पर्यवेक्षक श्री.अमर लवंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर मॅडम यांनी केले.
कायद्याचे ज्ञान हे प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे .विशेषतः विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांसोबत कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे याच उद्देशाने मार्गदर्शक न्यायाधीश श्री.सुमित विजयकुमार जोशी यांनी गुन्हेगारी जगतातली अनेक उदाहरणे देऊन उत्तम आयुष्यासाठी कायद्याचे महत्त्व विद्यार्थ्यांनी जाणून घेणे अत्यावश्यक आहे.हे समजून सांगितले. एडव्होकेट सुप्रिया सावंत मॅडम यांनी पोक्सो कायदा म्हणजे काय? कायद्यातील तरतुदी इ.बाबी विद्यार्थ्यांसमोर ठेवल्या. रस्ता सुरक्षा संदर्भात मोटर वाहन निरीक्षक श्री .संतोष साळुंखे व श्री. प्रवीणकुमार महादेव पाटील यांनी रस्ता सुरक्षिततेचे नियम व विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यासंदर्भात मार्गदर्शन केले. पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर मॅडम यांच्या प्रेरणा व प्रोत्साहनामुळे हा कार्यक्रम पटवर्धन हायस्कूलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी पटवर्धन हायस्कूलच्या कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मानसी चव्हाण यांनी केले. अतिशय शांततापूर्ण वातावरणात हा मार्गदर्शन वर्ग कार्यक्रम संपन्न झाला.
Home महत्वाच्या बातम्या नाटेकर, गांधी, कीर कनिष्ठ महाविद्यालयात पोक्सो कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा, रस्ता...













