बदनामी करण्याची धमकी देत 17 लाख रुपये उकळले

महिलेसह चौघांवर शहर पोलिसात गुन्हा
संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी : प्रतिनिधी
तालुक्यातील उमरे येथील प्रौढाला बदनामी करण्याची भिती घालून 17 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आह़े रामचंद्र चिंतामणी केळकर (52, ऱा उमरे, रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आह़े पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल करत अटक केल़ी शुक्रवारी त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आह़े
सुरैय्या हकिम, हुसैन नाईक, अंजर हकिम व अरफान हकिम (ऱा रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ गुह्यातील माहितीनुसार 22 जुलै 2025 रोजी तक्रारदार रामचंद्र केळकर हे आपल्या भावाला बघण्यासाठी शहरातील एका रुग्णालयात गेले होत़े याठिकाणी सुरैय्या हुसेन या रडत असल्याचे त्यांना दिसून आल़े याविषयी त्यांनी विचारणा केली असता सुरैय्या हिने मुलाचे ऑपरेशन झाले असून आपल्याकडे रुग्णालयाचे बील भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल़े यावर रामचंद्र यांनी सुरैय्या यांना आपला नंबर देत मदत करण्याचे आश्वासन दिल़े
सुरैय्या हिने दुपारच्या सुमारास रामचंद्र यांना फोन करुन मदतीचे पैसे देताय ना अशी विचारणा केल़ी त्यानुसार मारुती मंदिर येथे भेटून रामचंद्र यांनी सुरैय्या यांना 1 हजार 500 रुपये दिल़े यावर आपल्याला आणखी पैशाची गरज असल्याचे सुरैय्या हिने तक्रारदार यांना सांगितल़े त्यावर रामचंद्र यांनी सुरैय्या हिच्याकडून गुगल पे नंबर घेवून त्यावर 500 रुपये पाठविल़े यानंतर 23 जुलै 2025 रोजी सुरैय्या हिच्या मोबाईलवरुन एक पुरुषाने फोन करुन तुमचे सुरैय्या हिच्याशी काय बोलणे झाले ते आम्ही रेकॉर्ड केले आह़े तुमची बदनामी होवू नये असे वाटत असेल तर 10 हजार रुपये आणून द्या असे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल़ी
बदनामी होण्याच्या भितीने रामचंद्र यांनी संबंधित इसमाने सांगितलेल्या गुगलपे नंबरवर 10 हजार रुपये पाठवून दिल़े यानंतर संबंधित इसमाने पुन्हा रामचंद्र यांना फोन करुन तुमचे सुरैय्या हिच्याशी फोनवर झालेले बोलणे आमच्याकडे रेकॉर्ड केलेले अजूनही आह़े आम्हाला पैसे पाठविले नाही तर तुमचे नातेवाईक व मित्रपरिवाला ते आम्ही ऐकवू अशी धमकी देत वारंवार ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल़ी बदनामीच्या भितीने रामचंद्र केळकर यांनी संबंधित इसमाने सांगितलेल्या गुगल पे नंबरवर 22 जुलै 2025 ते 19 मे 2026 या कालावधीत एकूण 17 लाख 9 हजार 494 रुपये पाठविल़े
वारंवार ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी होत असल्याने रामचंद्र केळकर यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी सुरैय्या हकीम हिच्यासह चौघा जणांवर भारतीय न्याय संहिता 3(5), 308 (2),(5) नुसार गुन्हा दाखल केल़ा तसेच संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी याप्रकरणी पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिसांकडून करण्यात येत आह़े