नारी शक्ती फाउंडेशन व अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूलतर्फे आयोजन
लांजा (प्रतिनिधी): नारी शक्ती फाउंडेशन व अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल, लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने लांजा येथे २३ जून रोजी सकाळी ११ वाजता
महिला उद्योजकता व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने
हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, घरगुती व्यवसाय करणाऱ्या तसेच नवीन उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
सदर शिबिरात मोफत उद्यम आधार नोंदणी, व्यवसाय व व्यवस्थापन प्रशिक्षण, उद्योगविषयक मार्गदर्शन, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वितरण तसेच बँक कर्ज प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांना उद्योग क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमाचा लाभ पहिल्या ५० नोंदणीकृत महिलांनाच मिळणार असल्याने इच्छुक महिलांनी त्वरित नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, व नाव नोंदणीसाठी ९४२१६९५५२४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान, महिलांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास अथर्व मोटर ट्रेनिंग स्कूल च्या छाया गांगण व नारी शक्ती फाऊंडेशन यांनी व्यक्त केला आहे.












