मालवण | प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस मालवण तालुका भाजपाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
२३ जून रोजी सकाळी १०-३० वाजता श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे अभिषेक व धार्मिक कार्यक्रम होणार आहे. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम होणार आहे. भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकरव मालवण शहर भाजपा प्रभारी पंकज सादये यांनी दिली.












