पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपा युवा मोर्चाचा उपक्रम
वैभववाडी प्रतिनिधी :
मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा मा.श्री. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा वैभववाडीच्या वतीने आज दिविजा वृद्धाश्रम नांदगाव(असलदे) येथे वृद्धाश्रमाला आवश्यक स्टँडिंग फॅन आणि जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यात आले. यावेळी वैभववाडी सभापतीश्री. सिद्धेश रावराणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अतुल सरवटे, शहर अध्यक्ष आशिष रावराणे, सरचिटणीस सत्यजित रावराणे, उपाध्यक्ष रमेश शेळके, गुरुराज डोंगरे, समाधान गुरव, श्रेयस नेवरेकर,सुशांत कोलते,उदय रावराणे तसेच स्वस्तिक फाऊंडेशन चे सेक्रेटरी संदेश शेट्ये हे उपस्थित होते.












