S.S.P.M’s College of Engineering, कणकवली येथील विद्युत अभियांत्रिकी विभागाचा अंतिम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षी विभागाचा एकूण निकाल *90%* लागला आहे.
*गुणवंत विद्यार्थी*
– *प्रथम क्रमांक*: समृद्धी सावंत भोसले (सावंतवाडी) – *9.48 CGPA*
_विशेष उल्लेख_: समृद्धी सावंत भोसले हिने *मुंबई विद्यापीठ B.E. Electrical 2025-26* परीक्षेत *विद्यापीठात प्रथम क्रमांक* पटकावला असून *सत्र 1 ते सत्र 8* पर्यंतची *Overall Topper* होण्याचा मान मिळवला आहे.
– *द्वितीय क्रमांक*: दर्पण पाटील (मालवण) – *9.19 CGPA*
– *तृतीय क्रमांक*: श्रेयस ठाकूर (मुंबई) – *9.14 CGPA*
*प्लेसमेंट 2025-26*
विद्युत अभियांत्रिकी विभागातील *2025-26* या शैक्षणिक वर्षासाठी प्लेसमेंटचे प्रमाण *90%* इतके राहिले आहे. विभागातील *48 विद्यार्थ्यांची* नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली असून ते सध्या कार्यरत आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, विशेषतः मुंबई विद्यापीठ टॉपर समृद्धी सावंत भोसले हिचे, तसेच प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे व्यवस्थापन, प्राचार्य, सर्व प्राध्यापकवर्ग आणि कर्मचारीवृंद यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.











