*महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आमदार श्री. नितेशजी नारायणराव राणे साहेब वाढदिवसानिमित्त ‘एसएसपीएम’ हॉस्पिटलमध्ये भव्य मोफत महा-आरोग्य शिबिर; ३०० हून अधिक रुग्णांनी घेतला लाभ*
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आमदार श्री. नितेशजी नारायणराव राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल’ (पडवे) येथे एका भव्य मोफत महा-आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार, दिनांक २३ जून २०२६ रोजी करण्यात आले होते या शिबिराला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ३०० हून अधिक रुग्णांनी या मोफत वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला.
**सौ. निलम राणे यांच्याकडून हॉस्पिटलची पाहणी व रुग्णांशी संवाद**
या विशेष आरोग्य शिबिरादरम्यान सौ. निलम नारायणराव राणे यांनी स्वतः हॉस्पिटलला भेट देऊन संपूर्ण व्यवस्थेची आणि कॅम्पची पाहणी केली. त्यांनी शिबिरात आलेल्या विविध रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर दिला. राणे कुटुंबीयांच्या या संवेदनशीलतेमुळे रुग्णांमध्ये अत्यंत समाधानाचे वातावरण होते.
**सर्व सोयी-सुविधांनी युक्त नियोजन**
शिबिरात आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासकीय विभागाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये रुग्णांसाठी मोफत बस सेवा, नाष्टा आणि जेवणाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. खासदार नारायणराव राणे साहेब यांचे सिंधुदुर्गला आरोग्यसंपन्न करण्याचे स्वप्न पूर्ण करणे’ हाच मानस मनात बाळगून हॉस्पिटलच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी रुग्णांना तत्पर व योग्य सेवा दिली.
**विविध आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत उपचार**
या महा-आरोग्य शिबिरात कर्करोग, बालरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, जनरल सर्जरी, दंतरोग, कान-नाक-घसा, त्वचा रोग, किडनी विकार यांसारख्या विविध १४ हून अधिक विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची मोफत तपासणी केली .तसेच एक्स-रे, लॅब तपासणी, २डी इको आणि ई.सी.जी. यांसारख्या महागड्या चाचण्याही रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आल्या .
**राणे कुटुंबाचे मानले आभार**
अतिशय दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवल्याबद्दल उपस्थित सर्व नागरिकांनी आणि रुग्णांनी खासदार नारायणराव राणे साहेब, सौ. निलम राणे वहिनीसाहेब, आमदार निलेशजी राणे साहेब आणि आमदार नितेशजी राणे साहेब यांचे मनापासून आभार मानले व त्यांना उदंड आयुष्याचे आशीर्वाद दिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल संपूर्ण कर्मचारीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.













