रत्नागिरी : 15ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्य दिनाचा 76 वा वधपिन दिन साजरा केला जाणार आहे. परंपरेनुसार जिल्ह्यात पालकमंत्री तिरंगा ध्वज फडकावतील. राष्ट्रध्वजाला पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सलामी दिली जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या स्वातंत्र्यदिनासाठी भारताने एक विशेष थीम तयार केली आहे. राष्ट्र प्रथम, कायम प्रथम अर्थात Nation First Always अशा नावाची थीम यंदाच्या स्वातंत्र्यदिनासाठी ठरवण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून केले जाणार आहे.
नुकतेच शाश्वत विकास ध्येयांच्या जिल्हास्तरीय प्रगतीचे मापन करण्यासाठी शासनाने जिल्हा निर्देशक आराखडा प्रकाशित केलेला आहेत. एकूण 17 शाश्वत विकास ध्येये व त्या अंतर्गत 169 लक्ष्ये ही 2030 पर्यंत आपणा सर्वांना साध्य करायची आहेत. विकासापासून कोणीही वंचित राहू नये. ही मध्यवर्ती संकल्पना असलेला शाश्वत विकास अजेंडा हा सामाजिक, आथिक, विकासासह शिक्षण, आरोग्य. रोजगार, पर्यटन व पर्यावरणीय बाबीचा समतोल साधून महिला सशक्तीकरणासह सर्वागिण विकासाला चालना देतो. शाश्वत विकास ध्येयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक विकासाच्या गरजा ओळखून शाश्वत विकास ध्येयांचे सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. याची व्याप्ती तळागळापर्यत नेण्यासाठी शासन कटीबध्द असून जिल्हाच्या सर्वागिण विकास व आर्थिक, सामाजिक वृध्दीसाठी आपण 2030 पर्यत शाश्वत विकास ध्येये 1 ते 17 गाठण्यासाठी शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी व आदर्श शहरे व ग्राम निर्मितीत जिल्हयातील आपले सर्वांचे योगदान अपेक्षित आहे.
जिल्हा नियोजन अधिकारी, सहाय्य्क जिल्हा नियोजन अधिकारी आणि कर्मचारी वर्ग तर्फे रत्नागिरी जिल्हातील सर्व नागरिकांना स्वातंत्र दिनाच्या मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. अभीष्टचिंतन जय हिंद जय महाराष्ट्र.










