करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने 75 वृक्षांच्या रोपांची लागवड

 

‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत विविध उपक्रम संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अंतर्गत करुळ ग्रामपंचायतच्या वतीने वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच पंचप्राण शपथ घेण्यात आली. ग्रामदैवत श्री रामेश्वर देवालय व श्री केदारलिंग देवालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते, ग्रामपंचायत सदस्य रेखा सरफरे, ग्रामसेवक शशिकांत गुरव, सह्याद्री जीव रक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, रामचंद्र गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गुरव, दिगंबर शिंगरे, गणेश गुरव, हरिश्चंद्र गुरव, रामदास पांचाळ, भागोजी गुरव,श्री. बब्या गुरव, ग्रामपंचायत कर्मचारी श्रद्धा सावंत, जगदीश पांचाळ, प्रदीप कदम, तसेच उद्यान विद्या सांगुळवाडी महाविद्यालयचे कृषीदुत इंद्रजीत मोरे, अनिकेत जांबरे, अभिजीत जाधव, अवधूत पोळ, विशाल गायकवाड, प्रवीण हजारे, युवराज पाटील, युवराज हिवरकर, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. वेगवेगळ्या जातीची 75 वृक्षांच्या रोपांची लागवड याप्रसंगी करण्यात आली. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात पंचप्राण शपथ हातात दिवे लावून घेण्यात आली. गावातील हद्दीतील माती पंचायत समिती स्तरावरील समन्वयक यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपविण्यात आली