छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारमाठ परिसर महाराजांच्या घोषणानी दणाणला
मालवण | प्रतिनिधी : विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल, मालवण यांच्या वतीने हिंदू साम्राज्य दिन तथा ३५३ वा शिवराज्याभिषेक दिन शनिवारी २७ जून सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक, कुंभारमाठ येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फणसेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच मानवंदना देण्यात आली. उपस्थित शिवप्रेमींनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय’ घोषणांनी परिसर दणाणून सोडत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत फणसेकर विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष
भाऊ सामंत, जेष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, संघ कार्यवाह रत्नाकर कोळंबकर, बजरंगदल प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, राजेश वळंजू, दिनेश तोंडवळकर, अरविंद मयेकर, निशांत आर्लेकर, चिन्मय सामंत, तेजस चव्हाण, स्वप्नील घाडी, गणेश चव्हाण आदी उपस्थिती होते. कार्यक्रमात शिवरायांच्या शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा जागर करत त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्यात आले. यावेळी बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे सदस्य, शिवभक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन बजरंग दल, मालवणच्या पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त यांनी केले.











