मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई सुरूच…

प्लास्टिक व टायर जाळल्याप्रकरणी धुरीवाडा येथे कारवाई 

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभागाच्या वतीने प्रदूषणमुक्त मालवण शहर या दृष्टीने धडक कारवाई सुरु आहे. वायर व टायर जाळल्या प्रकरणी चार दिवसांपूर्वी शहरातील बांगीवाडा येथे कारवाई नंतर शुक्रवारी धुरीवाडा येथे कारवाई करण्यात आली. अब्दुल्ला रहीम अब्दुल्ला खान यांनी प्लास्टिक व टायर जाळल्या प्रकरणी 5 हजार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

 

स्वच्छता विभाग निरीक्षक संजय पवार, मुकादम आनंद वळंजू व मुकादम बाळकृष्ण जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

प्रतिबंधित प्लास्टिक विक्री व साठा याबाबतही मालवण नगरपरिषद प्रशासनाची कारवाई सुरु आहे. अनेक ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच दंड ही वसुल करण्यात आला आहे. त्यासोबतच मोठया प्रमाणात प्लास्टिक जाळून प्रदूषण निर्माण केल्या प्रकरणी पालिका प्रशासनाने धडक कारवाई सुरु केली आहे.