रत्नागिरी : अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी येथे अकरावी कला विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आमच्या महाविद्यालयात आत्तापर्यंत झालेल्या तीन प्रवेश फेऱ्यांमधून साठ टक्के ऍडमिशन पूर्ण झाले आहेत अजून तीनही फॅकल्टी कडे 40% जागा शिल्लक आहेत. अकरावीला आमच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि. 29 जून 2026 रोजी दुपारी ३ ते दि. 1 जुलै 2026 संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आपण पूर्वी भरलेला फॉर्म अनलॉक करून लॉक करणे गरजेचे आहे. दि. 3 जुलैला लागणारी मेरिट लिस्ट ही ओपन टू ऑल असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.
Home महत्वाच्या बातम्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय येथे अकरावी कला विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी ऑनलाईन...













