मडगाव- नागपूर गाडीचा शेगाव हाॅल्ट पुर्ववत – सचिन वहाळकर

Sachin vahalkar

मडगाव नागपूर ही विषेश गाडी कोकण रेल्वेमार्गावरून नागपूरला जाणारी एकमेव गाडी आहे. या गाडीला सुरुवाती पासून शेगाव हाॅल्ट नव्हता. तो कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या माध्यमातून प्रयत्न केल्यावर फेब्रुवारी२०२३ पासून देण्यात आला होता. यामुळेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील गजाननमहाराजांच्या भक्तगणाची मोठी सोय झाली होती. पण हा हाॅल्ट मध्य रेल्वेकडून जुलैपासून पुन्हा रद्दबातल करण्यात आला होता. सदर हाॅल्ट पुर्ववत करावा म्हणून मी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना २५ जुलै रोजी पत्र दिल होत तसेच त्यांचे प्रथम निजी सहायक डाॅ.जगदीश सकवान यांना विनंती केली होती की हि गाडी विशेष गाडी असल्याने हाॅल्ट साठी आपण प्रयत्न केल्यास मध्यरेल्वेच्या स्तरावर हाॅल्ट तातडीने पुर्ववत होऊ शकेल. माझ्या पत्रानुसार राज्यमंत्री दानवेंच्या कार्यालयातून आठ ऑगस्ट ला मध्यरेल्वेला हाॅल्ट पुर्ववत करण्याबाबत पत्र देण्यात आल होत.या पत्रानुसार कार्यवाही करत मध्यरेल्वे कडून शेगाव हाॅल्ट पुर्ववत करण्यात आला आहे. यामुळे गजाननमहाराज संस्थान ला भेट देणाऱ्या भक्तगणाची मोठी गैरसोय दुर झाली आहे. हाॅल्ट पुर्ववत केल्याबद्दल रावसाहेब दानवे यांच्यासह त्यांचे निजी सहायक डाॅ. जगदीश सकवान तसेच मध्यरेल्वेचे कोकण रेल्वेच्या प्रवासी वर्गाचा प्रतिनीधी म्हणून आपण आभारी आहोत अस प्रतिपादन सचिन वहाळकर यांनी केले.