Environment day should be celebrated everyday… Prashant Paranjape.
वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
दापोली | प्रतिनिधी:- पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आज साजरा होत आहे. या निमित्ताने निसर्गप्रेमी प्रशांत परांजपे यानी आपल्या आम्रपाली ग्रामसहवास या होम स्टे च्या माध्यमातून पर्यावरण प्रेमी पर्यटकांसाठी विशेष सहलीचे आयोजन केले होते.
आज मुक्त पत्रकार आणि वातावरण बदल या विषयातील तज्ज्ञ राधिका कुलकर्णी यांच्यासह अनेक पर्यटक खास निसर्गाची जवळून ओळख करून घेण्यासाठी त्यांच्या पर्यटन संकुलात आले होते.
आज पर्यावरण दिनानिमित्त आम्रपाली येथे वृक्षवल्लीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मूळ आम्रवृक्षाला (रायवळ) सजवण्यात आले होते.औक्षण करण्यात आले आणि सेंद्रिय खताचा केक वृक्षवल्लीला देण्यात आला.
या वेळी बोलताना प्रशांत परांजपे यांनी वृक्षारोपणा प्रमाणेच वृक्षांचे संवर्धनही महत्वाचे असून वृक्ष आणि पाणी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.त्यांच संवर्धन महत्वाचं असून अशा प्रकारे दररोज पर्यावरण दिन साजरा करून धरणी माता आणि निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाचं इवलं तरी योगदान असण अत्यावश्यक असल्याचं मत व्यक्त केले.