मसदे वडाचापाट स्वामी समर्थ मठ येथे 29 रोजी धार्मिक कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर :           श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २९ जून २०२६ रोजी

वट पौर्णिमे निमित्त

श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ :०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति वरती आणि स्वामी पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन, सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा,

सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यानी केले आहे.