वैभववाडीचे नगरसेवक रोहन रावराणे राज्यस्तरीय “लोकराजा राजश्री शाहू गौरव” पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर येथे पार पडला पुरस्कार वितरण सोहळा  

वैभववाडी l प्रतिनिधी :          वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक रोहन जयेंद्र रावराणे यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथे पार पडला. आविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन (एनजीओ), कोल्हापूर यांच्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. याच उपक्रमांतर्गत रोहन रावराणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

रोहन रावराणे हे वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीचे दोन वेळा नगरसेवक म्हणून नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच त्यांनी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पुरस्कार वितरण सोहळ्याला आविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, दत्तात्रय सूर्यवंशी, भारत माळी, एन. बी. मगदूम, शशिकांत मेहतर, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्या सौ. श्रावणी रोहन रावराणे, सौ. जयश्री रावराणे, अरुण उर्फ बाळा कदम, मंगेश घाडी, बाप्पी मांजरेकर, साहित्यिक सिताराम कुऱ्हाडे, उद्योजक डॉ. एम. बी. शेख, राजदीप सुर्वे, रंगराव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.