चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल,चिपळूण शैक्षणिक संकुलामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज गद्रे उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.शेंडे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या कार्यक्रमासाठी सर्व विभागातील विद्यार्थी तसेच संस्था पदाधिकारी, संकुलातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख,माजी विद्यार्थी, पालक आणि चिपळूण परिसरातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते.









