डेरवण यूथ गेम्स २०२५

ऑलिम्पिक प्रदर्शन खेळाडूंचे आकर्षण 

११ व्या डेरवण यूथ गेम्समध्ये स्विमिंग खेळाची प्रदर्शनाद्वारे माहिती 

चिपळूण,  : तालुक्यातील डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडासंकुलात ११व्या यूथ गेम्सला प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या खेळांची प्रदर्शनाद्वारे माहिती दिली जाते. यावर्षी स्विमिंग या खेळाच्या उत्पत्तीपासून आजतागायतच्या प्रगतीबाबत माहिती देण्यात आली आहे. स्विमिंग या प्रकारात मोडणाऱ्या स्विमिंग, डायव्हिंग आणि आरटिस्टिक स्विमिंग या प्रकाराच्या २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी नमूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त एसव्हिजेसिटी स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या स्विमर्सची माहिती आणि त्यांची उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली आहे.

स्विमिंगमधील ५०, १००, २००, ४००, ८०० आणि १५०० मीटर या विविध गटांतील ऑलिम्पिक विजेत्यांची नावे, जन्म दिवस, देश आणि प्रत्येक प्रकारातील वैयक्तिक कामगिरी यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. डायव्हिंग या प्रकारातील ३ मीटर स्प्रिंग बोर्ड आणि १० मीटर प्लॅटफॉर्म या प्रकारातील वैयक्तिक आणि सिक्रोनाईज्ड प्रकारातील विजेत्यांची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आर्टिस्टिक स्विमिंगमधील ड्युएट आणि टीम प्रकारातील ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी व आत्तापर्यंतचा विक्रम नमूद करण्यात आलेला आहे.

 

 

 

 

चौकट : मी डेरवणच्या एसव्हिजेसिटी या अ‍ॅकॅडमीत २०१८ साली प्रवेश केला. या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा तसेच प्रशिक्षक यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी स्विमिंग या खेळात नैपुण्य प्राप्त करू शकले. आत्तापर्यंत विविध सागरी जलतरण स्पर्धेत मी सहभागी झाले असून, २० पेक्षा अधिक सुवर्णपदके मिळवली आहेत. अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सर्वच सुविधा नि:शुल्क आहेत. आर्थिक अडचणीमुळे चांगला खेळाडू खेळापासून वंचित राहू नये असे उद्दिष्ट ठेवून अ‍ॅकॅडमीचे कामकाज नेहमी सुरू असते. अशी माहिती राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेती श्रावणी वालावलकर हिने दिली.

 

 

 

 

चिपळूण