भाजप किसान मोर्चा चे आयोजन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा, सिंधुदुर्ग यांच्या वतीने केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त ‘प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलन’ मंगळवार ३० जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात नैसर्गिक शेती, फळबाग व्यवस्थापन, मृदा आरोग्य तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. संमेलनात वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे, फळबाग तज्ज्ञ डॉ. रणजित देव्हारे, डॉ. मैथिलीश सणस, मृदा शास्त्रज्ञ डॉ. सागर मोरे, कृषी अधिकारी, वेंगुर्ले चे श्री. प्रकाश मोहिते, तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. धनंजय गोलेम आणि वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी श्री. मंगेश चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.
नैसर्गिक शेतीविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक तथा किसान मोर्चाचे श्री. ज्ञानेश्वर केळजी यांनी केले आहे.












