डिक्की फोडणारा मास्टरमाईंड जेरबंद…

जुना राजवाडा पोलिसांची धडक कारवाई…

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर : शहरातील मिरजकर तिकटी परिसरात दुचाकीच्या डीक्कीतून रोकड चोरणाऱ्या एका सराईत आंतरराष्ट्रीय चोरट्याला जिल्हा राजवाडा पोलिसांनी अटक करत मोठे यश मिळवले आहे. अटकेनंतरच्या चौकशीत या आरोपीचे कर्नाटक आणि गोवा राज्यांतील चोरीचा गुन्ह्यांचाही संबंध असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय चोरीच्या टोळीचे आणखी भागेद्वारे उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव संतोष हनुमंत कट्टीमनी वय ४१, रा.निंबाळ, ता.इंडी, जि.विजापूर, कर्नाटक) असे आहे १९ जून २०२६ रोजी सकाळी मिरजकर मार्केट परिसरात उभी असलेल्या इलेक्ट्रिक मोपेडची डिक्की उघडून फिर्यादी संतोष दिगंबर शिंदे यांच्या रोख रकमेवर चोरट्याने डल्ला मारला होता. या घटनेनंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यांनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा माघ काढला. पेट्रोलिंग दरम्यान पोलीस कर्मचारी अमर पाटील आणि प्रशांत घोलप यांना मिळालेल्या माहितीनुसार,भेंडी गल्ली परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.त्याची झडती घेतली असता डिकी उघडण्यासाठी वापरला जाणारा टेस्टर जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ५ हजार पाचशे रुपयांची रोकड आणि चोरीत वापरलेला टेस्टर असा एकूण ९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस तपासात आरोपीवर कर्नाटक व गोवा राज्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली.या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून अधिक तपास सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.