पीपल्स एज्युकेशन सोसायटी, कोकण विभाग दापोली तालुका अध्यक्षपदी भगवान घाडगे यांची निवड

दापोली(प्रतिनिधी):-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कोकण विभाग दापोली तालुका संस्थेवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी भगवानजी घाडगे यांची, तर सचिवपदी अशोकजी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच संस्थेच्या सदस्यपदी संजय महाडीक, राजेंद्र फणसे, नरेंद्र मांडवकर, भाऊ मोहिते, निवास जाधव आणि शरद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य असल्याची भावना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून दापोली तालुक्यात शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.