परुळे : प्रतिनिधी
कृषी दिनानिमित्ताने आज बुधवारी परुळे चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ येथे ग्रामपंचायत परुळेबाजार व सिंधुदुर्ग विमानतळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना वृक्ष वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज १ जुलै रोजी विमानतळ येथे कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत परुळे बाजार व सिंधुदुर्ग विमानतळ यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी वर्गाला वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच प्राजक्ता पाटकर, सदस्य सीमा सावंत, नमिता परुळेकर, माजी सरपंच पुरुषोत्तम प्रभू , भद्रायू परुळेकर, शंकर घोगळे, अमित देऊळकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, विमानतळ व्यवस्थापक कुलदीप सिंग यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.













