देवगड तालुक्यात १ जुलै रोजी १०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे श्री. सुशिल बाळकृष्ण नारकर (रा. विठ्ठलादेवी) यांच्या घरावर आंब्याची फांदी पडून घराच्या छपराचे नुकसान झाले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. नुकसानीचा पंचनामा लवकरच संबंधित प्रशासनामार्फत सादर करण्यात येणार आहे.












