रत्नागिरी: जिल्ह्यातील वाढत्या रस्ता अपघातांना आळा घालून अपघातांमध्ये किमान १०% घट घडवून आणण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात “Operation T.A.P.E for SAFE” हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत Technology (तंत्रज्ञान) अंतर्गत स्पीडगन, सी.सी.टी.व्ही. आणि ‘Safe Drive App’ चा वापर; Awareness (जनजागृती) अंतर्गत शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रबोधन; Penalty (कायदेशीर कारवाई) अंतर्गत नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई व परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव; आणि Engineering (अभियांत्रिकी सुधारणा) अंतर्गत अपघात प्रवण ठिकाणांची संयुक्त पाहणी करून तेथे फलक, रिफ्लेक्टर व स्पीड कामिंग उभारणे अशा चार प्रमुख स्तंभांवर काम केले जाईल. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामूनी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेच्या जिल्हास्तरीय पर्यवेक्षणाची जबाबदारी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात यांच्याकडे सोपवण्यात आली असून, “सुरक्षित रस्ता ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे” या भावनेतून सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि रस्ता सुरक्षेबाबतच्या आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना थेट त्यांच्याकडे सादर कराव्यात, असे आवाहन रत्नागिरी पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचा मोठा निर्णय; अपघात रोखण्यासाठी ‘ऑपरेशन T.A.P.E for SAFE’...













