डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड मध्ये स्वातंत्र्यदिन साजरा

मंडणगड | प्रतिनिधी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, मंडणगड. मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये संस्थेचे सरचिटणीस अॅड. श्री.विनोदजी दळवी साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत
ध्वजप्रतिज्ञा व संविधान प्रास्ताविका घेण्यात आली. या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संचलन केले व ध्वजाला मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून, मंडणगड तालुका पत्रकार संघ आयोजित ,’गाणे स्वातंत्र्याचे या गीत गायन स्पर्धेत १) प्राथमिक गट तृतीय क्रमांक २)उच्च माध्यमिक गट तृतीय क्रमांक व ३)माध्यमिक गट प्रथम क्रमांक मिळवलेला होता. व खुल्या गटातून कुमारी देवयानी जोशी हिने वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला होता. त्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी संस्थेचे सरचिटणीस अॅड.विनोदभाई दळवी साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. रमेशजी दळवीसाहेब, राजीव गांधी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन व संस्था सदस्य श्री.संतोषजी मांढरे साहेब, संस्था सदस्य श्री.राकेशजी शिंदे साहेब व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.शशिकांत चाेरगे हे उपस्थित होते.
त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा पाटील मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. अर्जुन हूल्लोळी सर व पर्यवेक्षक श्री. शांतारामबैकर सर , त्याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे स्वातंत्र्यदिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.