मंडणगड – प्रतिनिधी :L 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल बहादूर शास्त्री हायस्कूल दहागाव येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रशालेत आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख खेड येथील सरकारी वकील श्रीमती. जाडकर मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्या नंतर छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यात सुरुवातीला प्राथमिक व माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर समूह गीत सादर केली. त्या नंतर शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विविध विद्यार्थ्यांचा पुष्प व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मान्यवरांच्या मनोगतामध्ये गावचे सरपंच श्री. मंगेश दळवी यांनी स्वातंत्र्याचे महत्व पटवून दिले. त्या नंतर कार्यक्रमाच्या प्रमुख सरकारी वकील श्रीमती जाडकर मॅडम यांनी स्त्रीयांनी स्वातंत्र्य काळानंतर कशा प्रकारे प्रगती केली हे विषद केले. त्या नंतर मंडणगड तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई चे चिटणीस वकील श्री.गांधी साहेब यांनी स्वातंत्र्याचा इतिहास थोडक्यात सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. हुलगे सर, शिक्षक प्रतिनिधी सौ.नाटेकर मॅडम, पालांडे मॅडम,शेले सर, माने सर, इंगळे सर आदी शिक्षक उपस्थित होते. त्याच प्रमाणे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री. लोखंडे साहेब,निवृत्त शिक्षक श्री. पाटणकर सर व श्री.डहाळे सर, आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. इंगळे सर, व शेले सर यांनी केले.
अशा प्रकारे अतिशय उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला..












