मंडणगड | प्रतिनिधी : देशातील बौध्द विहारांचे व्यवस्थापनाच्या कायद्याची आवश्यकता समाजावून सांगण्याकरिता द धम्मसंहिता अँक्शन कमिटी ऑफ इंडिया यांच्यावतीने राज्यात सुरु असलेल्या जनसंपर्क अभियानाचे रत्नागिरी जिल्ह्यातील मोहीमेची सुरुवात मंडणगड तालुक्यातील कार्यक्रमाने करण्यात आली. 8 जानेवारी 2023 रोजी शहरातील डॉ. बाबसाहेब आंबडेकर स्मारकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दलित मित्र दादासाहेब मर्चंडे यांनी भुषविले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. अँड. दिलीप काकडे यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौध्द समाज सेवा संघ उपसभापती प्रभाकर पवार, मध्यवर्ती कमिटी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपाध्यक्ष श्री. तांबे, मुंबई अध्यक्ष गौतम जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, किरण पवार, सुवर्णा तांबे, शरद येलवे, शिवदास शिर्के, सरचिटणीस रामदास खैरे, समीर शिर्के, श्रीकांत जाधव या मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी मार्गदर्शन करताना अँड. दिलीप काकडे यांनी बौध्द विहाराचे व्यवस्थापन कायदा का व्हावा, त्याची आवश्यकता काय तो कशा प्रकारे असावा या विषयावर सविस्तर माहीती दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 साली बौध्द धम्माची दिक्षा दिली मात्र बाबासाहेबांना या पुढील काळात पुरेसा अवधी न मिळाल्याने बौध्दांचा कायदेशीर कायदा अस्तीत्वात आणता आला नाही. तो आजतगयात अस्तित्वात आलेला नाही. देशात प्रत्येक धर्माच्या प्रार्थना स्थळांच्या व्यवस्थापनासाठी कायदेशीर तरतूद करण्यात आली आहे. गुरुद्वारांकरिता शिरोमणी गुरुद्वार प्रबंध कायदा 1925, ख्रिचन चर्च करिता भारतीय कायदा 197 ख्रिचन न्यास कायदा, पारसी मंदिरांसाठी पारसी न्याय कायदा 1936, मुस्लिमाकरिता मुस्लिम वक्फ अधिनियम 1995, हिंदु ट्रस्ट कायदे तसेच मंदिरांकरिता विविध कायदे आहेत.हिंदुचे मंदिर, मुस्लिमांचे मस्जिद, ख्रिचनांचे चर्च, पारशांचे अँग्री मंदिर, शिखांचे गुरुद्वारा या सुमहांच्या प्रार्थना व्यवस्थापनासाठी कायदे करण्यात आलेले आहेत. पंरतू बौध्द विहाराच्या व्यवस्थापनासाठी कायदा झालेला नाही. याबाबींचा विचार करुन सखोल अभ्यासाअंती दि धम्म संहिता अँक्शन कमिटी ऑफ इंडियाने अभ्यास केला आहे, या कायद्यानिर्मीतीसाठी प्रयत्न सुरु असून त्याकरिता जागृतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यात असल्याने या अभियानास मंडणगड तालुक्यातून सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. कार्यक्रमास तालुक्यातील बौध्द समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.