चिपळूण (प्रतिनिधी) : कृषी दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल पाग, इंग्लिश मिडीयम स्कुल पाग व नगरपरिषद चिपळूण यांच्या वतीने मुख्याधिकारी संजय जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. मुख्याधिकारी यांनी शाळेतील विद्यार्थी वर्गाला नागरिकांनीही वृक्ष लागवडीचा संकल्प करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याधिकारी संजय जाधव म्हणाले की, “वृक्ष हे पर्यावरणाचे खरे रक्षक असून वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.” यावेळी नगरसेवक विकी नरळकर, सीमा चाळके, नैनेश तांबडे, बापू साडविलकर, मुख्याध्यापक शैलेश सुर्वे, मुख्याध्यापक साळुंखे, विनय गोठणकर, मानसी शिर्के, प्रतिमा कुचेकर, रुपेश इंगावले, प्रतीक सोनवडकर, राजेंद्र चाळके, दिनेश मोरे तसेच शिक्षक वृन्द, कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.













