स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष

जबरदस्तीने स्मार्ट मिटर बसवण्याचे प्रकार ; वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. जबरदस्तीने स्मार्ट मिटर बसवण्याचे प्रकार घडत आहेत. वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरी सरकारने लक्ष द्यावे या समस्येचा निवारा करावा. असे सांगत याबाबत ठाम भुमिका आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली.

जनतेच्या या महत्वाच्या प्रश्ना बाबत आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष वेधले.

आमदार निलेश राणे म्हणाले जबरदस्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मिटर बाबत सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. माझा मतदारसंघ ग्रामीण भागात येतो त्याच धर्तीवर अनेक मतदार संघात स्मार्ट मिटर संघर्ष सुरु आहे. अधिकारी मार खातील अशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आली आहे. ते होऊ नये, हे सगळे थांबावे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे.

स्मार्ट मिटर बाबत 4 टक्के तक्रारी आहेत हे सगळे खोटे आहे. 50 टक्के वर तक्रारी आहेत मात्र खालचे अधिकारी मंत्रालयात याबाबत माहिती देत नाहीत.

ग्राहकांच्या जुना मिटर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती नावाखाली हे लोक जातात आणि स्मार्ट मिटर लावतात. ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. या नंतर वीज बिलात मोठया प्रमाणात वाढ होते अश्या अनेक तक्रारी जनतेतून येत आहेत. माझ्या मतदार संघातील वीज ग्राहकांच्या शेकडो तक्रारी मी आणून देऊ शकतो.

स्मार्ट मिटर बाबत अनेक तक्रारी ग्रामीण भागात आहेत. तरी त्याची सुधारणा व तक्रारी निवारण बाबत तिकडचे अधिकारी काहीही करू शकणार नाही.

स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. त्याचा निवारा करण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. अशी भुमिका आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली.