आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा..
वेंगुर्ले : दाजी नाईक
दररोज वीज खंडित होत असल्याने ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबत जाब विचारण्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघातील सरपंच व पालकरवाडी ग्रामस्थांनी आज शुक्रवारी वीज वितरण कार्यालय कुडाळला धडक देत कार्यकारी अभियंता श्री. वनमोरे यांना धारेवर धरले. येत्या आठ दिवसात वीज पुरवठा सुरळीत न राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे.
आडेली जि. प. मतदार संघात सद्या वीज खंडित प्रकारामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. विजेच्या अनेक समस्या आहेत, त्यांवरील झाडे तोडली गेलेली नाहीत, जुने विद्युत पोल धोकादायक आहेत. जुन्या वीज लाईन बदलायचे आहेत, अशा अनेक समस्या आहेत. मात्र वीज वितरण कंपनी कडून त्या कडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी त्याचा त्रास सर्वांना होत आहे. याचा जाब आज या लोकप्रतिनिधींनी वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना विचारला. तसेच यावेळी पालकरवाडी
ग्रामपंचायतच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. पालकरवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत न केल्यास विजबिले न भरण्याचा इशारा सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष पप्पू परब, आडेली पं स. सदस्य नितीन मांजरेकर, पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील, वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर, मठ सरपंच रूपाली नाईक, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, वेतोरे सरपंच प्राची नाईक, आडेली सरपंच सौ कोंडस्कर आणि आडेली त मु समिती अध्यक्ष अविनाश तोरस्कर,तात्या कोंडस्कर, अजित नाईक, सचिन राऊळ सुधीर गावडे, रवींद्र धोंड , आबा येरम आणि मोठ्या प्रमाणात वेंगुर्ला भागातील ग्रामस्थ, व्यावसायिक उपस्थित होते.













