BREAKING NEWS : ‘जगबुडी’ ने ओलांडली धोका पातळी

खेड प्रतिनिधी
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे
अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे

खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे

सध्या नदीची पाणी पातळी 7.30 मी. इतकी आहे

*Jagbudi River @ Bharane naka Bridge Tal.Kd
Time: 11.00 @AM
Water Lvl : *07.30 M*.⬆️
Alert Lvl. : 5.00 M.
Danger Lvl : 7.00 M.

जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली; खेडमध्ये पूरस्थितीची शक्यता, नारंगी नदीलाही पूर

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली आहे. आज सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोकापातळी ७.०० मीटर आहे.
दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली असून खेड-खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.