स्मार्ट मिटर प्रश्नाला ही अधिवेशनात फोडली वाचा
जनतेच्या ज्वलंत प्रश्नांचा आमदार निलेश राणे बनले आवाज
अमित खोत | मालवण : मच्छिमार, शेतकरी, कष्टकरी यांसह सर्व स्तरातील जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडून त्यांना न्याय देण्याचे काम आमदार निलेश राणे सातत्याने करत आहेत. जनतेत स्मार्ट मिटर बाबत असलेल्या तक्रारिंची दखल घेत ‘स्मार्ट मिटर’ प्रश्नाही आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनात प्रभाविपणे मांडला. जिथे विषय गंभीर तिथे आमदार खंबीर. असेच चित्र नेहमीच दिसून येत आहे. जनतेच्या प्रश्नांचा आवाज बनून आमदार निलेश राणे जनतेला न्याय मिळवून देत आहेत. अधिवेशनात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची चर्चा सर्वत्र असून जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
वन्य प्राण्यांचा प्रश्न, शेतकरी बागायतदार यांचे नुकसान, घरकुल लाभार्थी प्रश्न, वाळू प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, आंबा काजु उत्पादकांना दिलासा, मच्छिमारांचा प्रश्न, आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न, मोकाट श्वान प्रश्न या सोबतच अनेक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत असताना जनतेला त्रासदायक ठरत असलेला स्मार्ट मिटर प्रश्न ही आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला.
जनतेचे प्रश्न मांडत असताना जनतेबद्दल असलेली त्यांची तळमळ, आस्था स्पष्टपणे दिसते. प्रभावीपणे प्रश्न मांडणी करून त्या प्रश्नांची गंभीरता सभागृहाला दाखवून देताना जनतेला न्याय मिळालाच पाहिजे ही ही ठाम भुमिका आमदार निलेश राणे यांच्या कार्यातून स्पष्ट होते.
स्मार्ट मिटर चा प्रश्न उपस्थित करताना आमदार निलेश राणे यांनी ठामपणे सांगितले, जबरदस्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मिटर बाबत सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. माझा मतदारसंघ ग्रामीण भागात येतो त्याच धर्तीवर अनेक मतदार संघात स्मार्ट मिटर संघर्ष सुरु आहे. अधिकारी मार खातील अशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आली आहे. ते होऊ नये, हे सगळे थांबावे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. स्मार्ट मिटर बाबत 4 टक्के तक्रारी आहेत हे सगळे खोटे आहे. 50 टक्के वर तक्रारी आहेत मात्र खालचे अधिकारी मंत्रालयात याबाबत माहिती देत नाहीत. ग्राहकांचा जुना मिटर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती नावाखाली हे लोक जातात आणि स्मार्ट मिटर लावतात. ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. या नंतर वीज बिलात मोठया प्रमाणात वाढ होते अश्या अनेक तक्रारी जनतेतून येत आहेत. माझ्या मतदार संघातील वीज ग्राहकांच्या शेकडो तक्रारी आहेत. स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. त्याचा निवारा करण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. ही आमदार निलेश राणे यांनी मांडलेले भुमिका ही खऱ्या अर्थाने जनतेचा आवाज ठरली. एकूणच प्रत्येक प्रश्न ठाम आणि अभ्यासपूर्ण मांडताना जनतेला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आमदार निलेश राणे नेहमीच आग्रही असून जनतेला न्याय मिळवून देत आहेत. सोबतच मोठया प्रमाणात विकास निधीही मतदारसंघात खेचून आणण्यात आमदार निलेश राणे यशस्वी ठरले आहेत.













