मसुरे | झुंजार पेडणेकर : राज्याचे मत्स्य विकास आणि बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा वडाचापाट या प्रशालेस कपाट भेट दिले.
यावेळी सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, माजी सभापती श्री राजेंद्र प्रभुदेसाई, उपसरपंच सचिन पाताडे, विनायक प्रभुदेसाई, दयानंद प्रभुदेसाई, प्रथमेश पालव, शाळा मुख्याध्यापक, इतर शिक्षक व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशालेच्या वतीने कपाट भेट दिल्याबद्दल आभार मानण्यात आले.










