डेडलाईन पाळण्याच्या नादात प्रवाशांच्या जीवाशी खेळ ?

भरावाच्या भिंतीच्या सिमेंट काँक्रेट प्लेट ढासळल्या, उड्डाणपुलाच्या भरावाच्या रस्त्याला भेगा

संतोष कोत्रे
लांजा (प्रतिनिधी): लांजा शहरात उपशेट्येवाडी येथे उड्डाणपूलाच्या भारावाच्या भिंती च्या सिमेंट काँक्रेट प्लेट ढासळत असून वरील भागात बनवलेला डांबरी चा रस्ता खचला आहे. . रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकर लवकर पूर्ण करण्याच्या डेडलाईन पूर्ण करण्याच्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेली पंधरा वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्यानंतर लांजा शहरातील रखडलेल्या उड्डाणपूल आणि भारावच्या भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र आता हे भारावाच्या भिंतीचे काम टकलादु आहे का? डेडलाईन पूर्ण करण्याच्या नादात मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी आणि लांजातील स्थानिक नागरिक यांच्या जीवाशी खेळ खेळला जातो आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचे कारण म्हणजे लांजा उपशेट्येवाडी
येथे उभारण्यात आलेल्या भारावाच्या भिंतीच्या सिमेंट प्लेट ढासळल्या होत्या. ही बाब ठेकेदार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर शनिवारी दुपारी ढासळलेल्या प्लेटच्या ठिकाण सिमेंट लावून त्या बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला.
याबरोबरच प्रस्तुत प्रतिनिधीने त्या भारावाच्या भिंतीवर तयार करण्यात येणाऱ्या डांबरीकरणाच्या रस्त्याची पाहणी केली असता या हा रस्ता एका ठिकाणी खचला असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा देखील पडल्याचे निदर्शनास आले आहे अशाप्रकारे धोकादायकपणे हे काम होत आहे का? यात संभाव्य दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असे प्रश्न या निमित्ताने पुढे आले आहेत