वार्तापत्र -कोकण
संतोष वायंगणकर.
खरोखरीच जर विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध असेल तरीही चालले असते. परंतु विशुद्ध हेतूने जाणीपूर्वक अफवा पसरवून फक्त राजकिय फायद्यासाठी सगळ सुरू असत. जे विरोध करणारे आहेत ते निवडणुका जवळपास आहेत किंवा ज्यांना आमदारकीची, खासदारकीची स्वप्न पडतात अशी पुढारी, नेते मंडळी मग अशा अफवा पसरवतात. कोकणातील भोळी-भाबडी लोक बळी पडतात. त्यांना वाटून जात जे विरोधक बोलत आहेत तेच सत्य आहे. सत्तेवरचे खोट बोलत आहेत अशी हवा पसरवणारी एक टोळक कार्यरत असत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा कार्यपद्धतीने करणारे काही कार्यरत आहेत. यामुळे रायगड असेल रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात विकास काम एखादा चांगला वाईट प्रकल्प यायचा झाला की त्याला विरोध सरू होतो.
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादा प्रकल्प यायचा असेल किंवा त्याची नुसती चर्चा जरी सुरू झाली तरीही कोकणातील विकास कामांना विरोध करणारे काही व्यक्ती कोकण विकासाच्या विरोधी कामात सतत कार्यमग्न असतात. तसच काहीसं सध्या कोकणात सुरू आहे. कोणत्याही प्रकल्पाला विरोधच करायचा हिच भुमिका रहाते. त्यासाठी जनतेच्या हिताचा आहे की त्यातून जनतेच अहित होणार आहे याबद्दल कोणालाच कोणतही सोयर-सुतक नसत. त्यांच्या बऱ्या-वाईट परिणामांचाही काही देणं-घेणं नाही. त्यातून आपणाला स्वार्थी राजकारण कसे करता येईल याचाच राजकिय हिशोब मांडला जातो. बरं यासाठी काही तथाकथित सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था नेहमीच विकास प्रकल्पांच्या आड येत असतात. हा अनुभव नेहमीचाच राहिला आहे. अणुउर्जा प्रकल्प देवगडमध्ये होणार नाही अशी चर्चा नाही. मात्र, अदानी गृपकडून करार झाला परंतु जागा निश्चित नसताना देवगडमध्ये अणुउर्जा प्रकल्प होण्याचे भाकीत का आणि कशासाठी कोण करत आहेत यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. देवगडमध्ये अणुउर्जा प्रकल्प होणार नाही यासंबंधी महाराष्ट्राचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी देवगडमध्ये पत्रकार परिषद घेऊन अणुउर्जा प्रकल्प देवगडमध्ये कोणत्याही स्थितीत होणार नसल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात जाहीर केले तरीही काहीनी राजकारणासाठी म्हणून आंदोलनाचा हा विषय केला. त्यात दुसरी बाब म्हणजे आंबा, काजू नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा विषय होता. त्यातही राज्यसरकारने टप्या-टप्याने नुकसान भरपाई कशापद्धतीने दिली जाणार आहे हे देखिल राज्याचे कृषीमंत्री ना. दत्ता भरणे यांनी विधीमंडळात जाहीर केले. त्याप्रमाणे कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांसाठी द्यायचे मदतीची आर्थिक तरतूद आणि ते पैसे वळतेही करण्यात आले. सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे यांनी कोकणात मोठ्याप्रमाणावर आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाल्याचे फेब्रुवारी-मार्च महिन्यातच सरकारच्या निदर्शनास आणून दिले. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वस्तुनिष्ठ माहितीही दिली. तेव्हा राज्यसरकारने कोकणातील आंबा,काजू बागायतदारांना निश्चितपणे नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले होते. या पावसाळी अधिवेशनात कोकणातील आंबा, काजू बागायतदारांचा प्रश्न विधानसभेत आ.निलेश राणे यांनी प्रखरपणे मांडला आणि सरकारकडे आग्रही मागणीही केली. कोकणातील आंबा, काजू बागायतदारांना तत्काळ मदत सरकारने कोकणाला दिले. यात सरकारकडे आंबा, काजू बागायतदारांना जास्तीची मदत मिळावी यासाठी आग्रही रहाण्यात काहीच गैर नाही. परंतु प्रत्येक बाबतीत राजकारण शोधायचे आणि राजकिय इश्यू करायचा हे देखिल कोकणच्या हिताचे निश्चितच नाही. काहींची राजकिय दुकानदारी अशाच अफवांच्या आधारे चालू असते हे कोकणाने पाहिले आहे. कोकणात अणुउर्जा प्रकल्प होऊच नये याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोधच करायचा तो प्रकल्प येऊ नये म्हणून विरोधाची राळ उठवायची जनतेचा बुद्धीभेद करायचा हेच सातत्याने सुरू आहे.
खरोखरीच जर त्यात विरोध करणाऱ्यांचा हेतू शुद्ध असेल तरीही चालले असते. परंतु विशुद्ध हेतूने जाणीपूर्वक अफवा पसरवून फक्त राजकिय फायद्यासाठी सगळ सुरू असत. जे विरोध करणारे आहेत ते निवडणुका जवळपास आहेत किंवा ज्यांना आमदारकीची, खासदारकीची स्वप्न पडतात अशी पुढारी, नेते मंडळी मग अशा अफवा पसरवतात. कोकणातील भोळी-भाबडी लोक बळी पडतात. त्यांना वाटून जात जे विरोधक बोलत आहेत तेच सत्य आहे. सत्तेवरचे खोट बोलत आहेत अशी हवा पसरवणारी एक टोळक कार्यरत असत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा कार्यपद्धतीने करणारे काही कार्यरत आहेत. यामुळे रायगड असेल रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात विकास काम एखादा चांगला वाईट प्रकल्प यायचा झाला की त्याला विरोध सरू होतो. यामुळेच कोकणातील कोणताही प्रकल्प घ्या तो प्रकल्प वर्षानुवर्षे रखडल्याने शेवटी अयशस्वीच झालेला दिसेल. कोकणात अणुउर्जा प्रकल्पाला विरोध म्हणून जलसमाधी घेण्याचे आंदोलन करण्यात आले. एखाद्या कोणत्याही विषयासंबंधी मतमतांतर असू शकतात. परंतु नकारात्मकता पसरवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात तेच चुकीचे होतात. त्यामुळे कोकणात कोणताच उद्योजक उद्योग उभारणी करण्यासाठी यायला उत्सुक नाही. कोकणात उद्योजक यायलाच तयार नाहीत त्याचे केवळ सर्वच बाबतीत होणारा विरोध हेच कारण आहे. जे प्रत्येक बाबतीत विरोधाची भुमिका घेऊन आहेत त्यांनी एखादा तरी पर्यावरणाला पुरक उद्योगासाठी पुढाकार घ्यावा. निश्चितपणे त्याच स्वागतच होईल.













