Lanja Breaking : आसगे येथे कारवर झाड कोसळून नुकसान

पावसामुळे तालुक्यात काही ठिकाणी पडझड,

लांजा (प्रतिनिधी) : संततधार पावसामुळे आसगे मांडवकरवाडी येथे उभ्या असलेल्या कारवर झाड कोसळून नुकसान झाले की घटना आज सोमवारी सकाळी घडली आहे. याबरोबरच तालुक्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने गांजा चालू केला झोडपून काढले आहे. आज सोमवारी सकाळी आसगे मांडवकरवाडी दत्त मंदिर येथे पार्किंग केलेल्या कारवर वडाचे झाड पडल्याने कारचे नुकसान झाल्याची घटना घडली. तर व्हेळ पाचल या मार्गावर सोमवार सकाळी झाड पडल्याने वाहतूक काही काळ खंडित झाली होती . ग्रामस्थांच्या मदतीने हे झाड तोडून बाजूला करण्यात आले. पावसामुळे पन्हळे कुडकरवाडी येथे संरक्षक भिंत कोसळली. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
याबरोबरच चाफेट येथे मंगला गुणे यांच्या घरावर फणसाची फांदी पडल्याने त्यांच्या घराच्या पडवीचे सिमेंट पत्रे फुटून नुकसान झाले आहे.